breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

भारतीय सिनेसृष्टीसाठी भावूक क्षण, ऑस्कर कार्यक्रमात नितीन देसाईंना श्रद्धांजली!

Oscar Awards 2024 | यंदाचा ऑस्कर सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये आज (११ मार्च रोजी) पार पडला. या सोहळ्यातील ‘इन मेमोरिअम’ सेगमेंटमध्ये बॉलीवूडमधील मराठमोळे कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली. या सोहळ्यात उपस्थितांनी नितीन देसाईंचं स्मरण केलं.

‘लगान’ हा चित्रपट २००२ साली ऑस्करला गेला होता. त्याचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई होते. लगानने सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीत अंतिम पाच चित्रपटात स्थान मिळवले होते. ‘स्लमडॉग मिलेनियर’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटाचं कला दिग्दर्शन देखील त्यांनीच केलं होतं.’स्लमडॉग मिलेनियर’या चित्रपट ओरिजनल स्कोअर कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा     –      राज्य सरकारची मोठी घोषणा, कोस्टल रोड छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार 

नितीन मुंबईजवळच्या कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये २ ऑगस्ट २०२३ रोजी मृतावस्थेत आढळले होते. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नितीन देसाईंवर मृत्यूपूर्वी तब्बल २४९ कोटींचं कर्ज होतं, ठराविक मुदतीसाठी घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे नितीन देसाई यांच्या कर्जत चौक येथील एन. डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईचे संकट ओढावले होते. त्यानंतर देसाईंनी स्टुडिओतच गळफास घेत जीवन संपवलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button